वडखळ येथे ट्रॉमा केअर उभारणार

By Admin | Updated: December 26, 2014 22:37 IST2014-12-26T22:37:35+5:302014-12-26T22:37:35+5:30

सुधागड-पाली येथे ग्रामीण रुग्णालय, तर वडखळ येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

Trauma Care will be set up at Vadakhal | वडखळ येथे ट्रॉमा केअर उभारणार

वडखळ येथे ट्रॉमा केअर उभारणार

अलिबाग : सुधागड-पाली येथे ग्रामीण रुग्णालय, तर वडखळ येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर, जांभूळपाडा तसेच सुधागड पाली येथे पाहणी दौऱ्यावर ते होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, आरोग्य उपसंचालक आर. आर. रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. ए. पाटोळे, रोहा उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्यमंत्री म्हणाले, खालापूर व सुधागड, पाली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजना ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेपर्यंत पोहचवून त्याचा लाभ त्यांना दिला पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरली जातील. जिल्ह्यात ब्लड कॉल योजना लवकरात लवकर सुरु करावी, अशा सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवळी यांना दिल्या. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Trauma Care will be set up at Vadakhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.