कच:यावर पुनप्र्रक्रिया करा!
By Admin | Updated: October 3, 2014 00:58 IST2014-10-03T00:58:52+5:302014-10-03T00:58:52+5:30
पावसाळा सुरू होण्याआधी मुंबईतल्या प्लॅस्टिकच्या कच:याची शोधाशोध सुरू होते. नाहीतर या प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या अडकून पाणी साचण्याची समस्या निर्माण होते.

कच:यावर पुनप्र्रक्रिया करा!
नरेंद्र जावरे अचलपूर
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेवर रेड अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. अवैध शस्त्रे, दारुगोळा, रोख रक्कम, संशयित व कुख्यात आरोपींवर पोलीस, महसूल व दोन्ही राज्याचे संयुक्त पथक कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी मध्यप्रदेशच्या पोलीस व महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
बैठकीला निवडणूक निरीक्षक मणिशंकर मिश्रा, बैतुलचे जिल्हाधिकारी राजेश मिश्रा, पोलीस अधीक्षक सुधीर लाड, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, उपविभागीय अधिकारी मस्के, संजय मीना, मोर्शीचे ललितकुमार वऱ्हाडे, बैतुलचे आय.जे. खालको, खंडवा येथील डी.के.वर्मा, मुलताईचे पंकज जैन, अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तामगाडगे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैतुल, बऱ्हाणपूर, खंडवा व छिंदवाडा या जिल्ह्यांच्या सीमारेषेवर मेळघाट, अचलपूर, मोर्शी या तीन विधानसभा मतदारसंघांचा काही भाग येतो. सीमारेषेवरील गावांवर नजर ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले.
दारुबंदी विभागावर ताशेरे
अचलपूर : जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध भागांत २२ दिवसांमध्ये दोनशेपेक्षा अधिक ठिकाणी दारु जप्तीच्या कारवाया करण्यात आल्या. मोर्शीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी साडेसहा लक्ष रुपयांची अवैध दारु पकडली. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारुबंदी कार्यालयातर्फे एकही कारवाई झाली नाही, याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परवानाधारक दारू दुकानदारांची गत महिन्यातील विक्री व या महिन्याच्या विक्रीचा ताळमेळ लावून गोदामांची तपासणी करण्याचे आदेश दिले. परवानाधारक दुकानदार अवैध दारू विक्रीस सहकार्य करीत असल्याचे उघडकीस आल्यास त्यांचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
वर्धा जिल्ह्यावर विशेष लक्ष
वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असली तरी मध्यप्रदेशातून तेथे अवैध दारुचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याच्या सीमेवर मध्यप्रदेश व अमरावती जिल्ह्यातील विशेष पथकाच्या माध्यमातून लक्ष पुरविले जात आहे. मेळघाटच्या बारातांडा, भोकरबर्डी, धामणगाव गढी, सेमाडोह डोमा, भांडूम, बिहाली, हरिसाल, बहिरम तर वरुडच्या पांढुर्णा पॉर्इंट, मुलताई, सालबर्डी, सायवारा, आमनेर, सिंभोरा, कखार, रवाळा, हातुर्णा आदी २१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गावांकडे विशेष लक्ष ठेवले जात आहे.
दोन्ही राज्याच्या मतदार याद्यांची तपासणी
लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेली मतदारांची फरफट पाहता विधानसभेत मतदार यादीची तपासणी हिरीरीने केली जात आहे. त्यामुळे मध्यप्रदेशच्या रहिवाशांची नावे महाराष्ट्रात तर नाहीत ना, याची खात्री करुन घेतली जात आहे.