सात तास वाहतूक कोंडी
By Admin | Updated: August 8, 2014 00:04 IST2014-08-08T00:04:26+5:302014-08-08T00:04:26+5:30
गुरुवारी सकाळी शिळफाटा रोडवर अडवली भुतवली जंक्शन येथे ट्रेलर बंद पडला. यामुळे महापे शिळफाटासह ठाणो - बेलापूर रोडवर चक्काजाम झाले होते. जवळपास 7 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

सात तास वाहतूक कोंडी
>नवी मुंबई : गुरुवारी सकाळी शिळफाटा रोडवर अडवली भुतवली जंक्शन येथे ट्रेलर बंद पडला. यामुळे महापे शिळफाटासह ठाणो - बेलापूर रोडवर चक्काजाम झाले होते. जवळपास 7 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाहतुकीची ही समस्या निर्माण झाली होती. शिळफाटा मार्गाने कल्याणच्या दिशेने जाणारा ट्रेलर साडेसहा वाजण्याच्या सुमारास अडवली भुतवली येथे बंद पडला. त्यामुळे सदर ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने दोनही दिशेला जाणारी वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन महापे पुलार्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर बंद पडलेला हा ट्रेलर हटवण्यासाठी हायड्रा क्रेनची मदत घेण्यात आली. परंतु तोर्पयत अनेकांनी आपली वाहने एमआयडीसीमधील मार्गावर वळवली. त्यामध्ये अनेकांनी रस्त्यावर विरुध्द दिशेने वाहने चालवल्याने तेथेही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. या प्रकारात वाहतुकीचा खोळंबा होऊन त्याचा परिनाम ठाणो बेलापूर मार्गावर देखील जाणवला. शिळफाटाकडे जाणा:या वाहनांच्या रांगा महापे पुलाखालून ठाणो बेलापूर मार्गाला जोडल्या गेल्या. त्यामुळे ठाणो बेलापूर मार्गावर खैरणोर्पयत वाहतूक कोंडी निर्माण झाली. अखेर वाहतूक कोंडीतला हा प्रवास टाळण्यासाठी वाशीकडे जाणारी अनेक वाहने कोपर खैरणो अंतर्गतच्या मार्गावर वळवली जात होती. परंतु अचानक कोठय़ा प्रमाणात वाहने वाढल्याने वाशी कोपर खैरणो मार्गावर देखील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रस सहन करावा लागला. दुपारी बारा वाजेर्पयत नागरिकांना हा वाहतूक कोंडीचा त्रस सहन करावा लागला.
दरम्यान अडवली जंक्शन येथे बंद पडलेला कंटेनर हायड्रा क्रेनच्या मदतीने हटवण्यात आल्याचे वाहतूक सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजेर्पयत शिळफाटा मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)