वाहतूककोंडी फुटणार!
By Admin | Updated: December 20, 2014 01:28 IST2014-12-20T01:28:28+5:302014-12-20T01:28:28+5:30
काळानुरूप बदलत वाहतुकीच्या मार्गात मोठा अडथळा ठरलेल्या दादर पश्चिम येथील प्रसिद्ध कबुतरखान्याला जुनी ओळख परत मिळणार आहे़

वाहतूककोंडी फुटणार!
मुंबई : काळानुरूप बदलत वाहतुकीच्या मार्गात मोठा अडथळा ठरलेल्या दादर पश्चिम येथील प्रसिद्ध कबुतरखान्याला जुनी ओळख परत मिळणार आहे़ सुमारे पाच हजार कबुतरांचे आश्रयस्थान असलेल्या
या पुरातन वास्तूच्या डागडुजीबरोबरच येथील वाहतुकीची कोंडी
फोडण्याची तयारी पालिकेने केली आहे़
उपनगराला शहराशी जोडणारे दादर कायम वाहतुकीने गजबजलेले असते़ मात्र पश्चिमेकडे रस्त्याच्या मधोमध असलेल्या कबुतरखान्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात़ त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी कबुतरखाना हलविणे अथवा त्यात बदल करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती़ कबुतरांमुळे आरोग्य आणि अपघाताचा धोका असल्याने ही वास्तू पाडण्याची मागणीही एका वर्गाकडून होत होती़ मात्र दादरची ओळख असलेला कबुतरखाना तोडण्यास अनेकांचा विरोध होता़
कारंजे, कबुतरांची घरटी आणि छोटा दवाखाना असा सध्याचा कबुतरखाना आहे़ या कबुतरखान्यावरील छत यापूर्वी काढण्यात आले आहे़ त्या जागी आता काचेचे छत बसविण्यात येणार आहे़ तसेच वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी कबुतरखान्याच्या बाजूने असलेल्या वाहतूक बेटांची रुंदी कमी करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर कारंजे व रेलिंग दुरुस्त करण्यात येतील, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)