Join us

मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तातडीने नियुक्तीच्या जागी हजर होण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 06:40 IST

Police : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी त्याचे आदेश गुरुवारी जारी केले. संबंधिताना तातडीने नियुक्तीच्या जागी हजर होण्याचे आदेश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पोलीस दलातील प्रलंबित उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ‘मुहूर्त’ मिळाला आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ७ अधिकाऱ्यांसह एकूण १८ भापोसे व मपोसे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी त्याचे आदेश गुरुवारी जारी केले. संबंधिताना तातडीने नियुक्तीच्या जागी हजर होण्याचे आदेश दिले.बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशी (कंसात कोठून-कोठे):हरी बालाजी (सशस्त्र पोलीस दल, नायगाव-परिमंडळ १), महेंद्र पंडित (बंदर-एस.टी.एफ. आर्थिक गुन्हे), सौरभ त्रिपाठी (संरक्षण-परिमंडळ २), डी. एस. स्वामी (परिमंडळ १२ - परिमंडळ ८), सोमनाथ घार्गे (वाहतूक, पश्चिम - परिमंडळ१२), मंजुनाथ शिगे (परिमंडळ८ - परिमंडळ ९), योगेश कुमार गुप्ता (वाहतूक, दक्षिण- मुख्यालय २), गीता चव्हाण (मुख्यालय २-बंदर परिमंडळ), शशिकुमार मिना (परिमंडळ१ - सशस्त्र पोलीस दल नायगाव).प्रतीक्षेतील अधिकारीनिलोत्पल ( गुन्हे प्रकटीकरण -१), सुनील भारद्वाज (सशस्त्र, मरोळ), नितीन पवार (वाहतूक, पश्चिम), प्रज्ञा जेंडगे (वाहतूक दक्षिण), महेश चिमटे (संरक्षण), श्रीकृष्ण कोकाटे (सशस्त्र, ताडदेव), हेमराज रजपूत (सशस्त्र, कोळे कलिना), राज तिलक रोशन (वाहतूक, मुख्यालय),व संजय लाटकर (सुरक्षा).

टॅग्स :मुंबई पोलीस