११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 06:14 IST2017-12-30T06:14:28+5:302017-12-30T06:14:35+5:30

मुंबई : राज्य शासनाने शुक्रवारी ११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या.

Transfers of 11 IAS officers | ११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या

११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने शुक्रवारी ११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या. अतुल पाटणे यांची सहकार व पणन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त एन.के. पोयाम यांची मुंबई कामगार आयुक्तपदी वर्णी लागली आहे. गृहनिर्माण विभागाचे सहसचिव बी.जी. पवार यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील.
नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर.एस. जगताप यांना पुणे येथील कृषी प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या सचिव सदस्यपदी नियुक्ती देण्यात आली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस. रंगा नाईक यांची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. तर एम.जी. गुर्सल मुंबईत विक्री कर विभागाचे सहआयुक्त असतील. गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे यांची नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंघला औरंगाबाद येथील जल व मृदा संधारणचे आयुक्त असतील. जळगाव उपविभागाचे साहाय्यक जिल्हाधिकारी जलाज शर्मा यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बदली करण्यात आली आहे.

Web Title: Transfers of 11 IAS officers

टॅग्स :Mumbaiमुंबई