फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निकालाचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:59 IST2017-07-19T01:59:07+5:302017-07-19T01:59:07+5:30

मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याने हजारो विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षणाचे मार्ग अडले आहेत. मोहालीच्या नायपर येथील फार्मसीच्या अभ्यासक्रमाची मुदत

Transcript of transcript for pharmacy students | फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निकालाचा उतारा

फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निकालाचा उतारा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याने हजारो विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षणाचे मार्ग अडले आहेत. मोहालीच्या नायपर येथील फार्मसीच्या अभ्यासक्रमाची मुदत संपत आल्याने विद्यार्थ्यांनी कुलगुरुंशी संपर्क साधला होता. कुलगुरुंनी यात लक्ष देत तात्पुरत्या निकालाचा यावर उतारा काढला आहे.
तात्पुरत्या निकालामुळे काही विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले असून अजूनही काही विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना तात्पुरता निकाल मिळालेला नाही, त्यांच्याविषयी बुधवारी निर्णय होऊ शकतो.

Web Title: Transcript of transcript for pharmacy students