ट्रान्स हार्बर लोकल सहा दिवस विस्कळीत
By Admin | Updated: April 1, 2015 00:03 IST2015-04-01T00:03:11+5:302015-04-01T00:03:11+5:30
ठाणे ते वाशी आणि नेरुळ दरम्यान अभियांत्रिकी काम हाती घेतले जाणार असून या कामासाठी मध्य रेल्वेकडून ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय झाला आहे.

ट्रान्स हार्बर लोकल सहा दिवस विस्कळीत
मुंबई : ठाणे ते वाशी आणि नेरुळ दरम्यान अभियांत्रिकी काम हाती घेतले जाणार असून या कामासाठी मध्य रेल्वेकडून ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय झाला आहे. २ ते ८ एप्रिलपर्यंत (रविवार सोडून) दुपारी दीड तास हा ब्लॉक घेतला जाणार असून प्रत्येक दिवशी १४ फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. हा ब्लॉक दुपारी पावणे एक ते दुपारी सव्वा दोन वाजेपर्यंत घेतला जाईल. रद्द करण्यात येणाऱ्या फेऱ्या या अप आणि डाऊन मार्गावरील प्रत्येकी सात फेऱ्या असतील, असे सांगण्यात आले. यामुळे ट्रान्स हार्बर प्रवाशांचे मात्र हाल होणार आहे. ब्लॉक हा कामाच्या
दिवशी घेण्यापेक्षा रविवारी का नाही घेतला असा सवाल होत आहे.