मुंबई : राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत मेडिकल, नर्सिंग व हेल्थ केअर सेक्टरमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांत आतापर्यंत १०,८१५ युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविले आहे.कोरोना नियंत्रणात आरोग्य सेवकांची असलेली मोठी गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने या युवक-युवतींची यादी आरोग्य विभागास तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. हेल्थ केअर सेक्टरमधील हे प्रशिक्षित उमेदवार असून गरजेनुसार त्यांच्या नियुक्तीबाबत विचार व्हावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.
हेल्थ केअर सेवांबाबत राज्यातील साडेदहा हजार तरुणांना प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 05:29 IST