Join us
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी १० लाख युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण संधी: मंत्री मंगल प्रभात लोढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 07:54 IST

उद्योजकांशी साधला संवाद

मुंबई : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून दरवर्षी १० लाख जणांना प्रशिक्षण संधी उपलब्ध होणार असून कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे खासगी क्षेत्रातील उद्योजकांनी रोजगाराची मागणी नोंदविण्यासाठी आयोजित ‘उद्योजकांशी संवाद’ बैठकीत ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी, नोडल अधिकारी हृषिकेश हुंबे उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील ४० उद्योजक तसेच खासगी उद्योजकांच्या संघटनांचे २० प्रतिनिधी  सहभागी झाले. लोढा म्हणाले, आगामी पाच वर्षात ४.१ कोटी अधिक युवकांना रोजगार व कौशल्य विकासाची संधी निर्माण करण्यासाठी केंद्राने दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. (वा. प्र.) 

 

टॅग्स :मंगलप्रभात लोढा