Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रियेचे आजपासून प्रशिक्षण वर्ग, ५० हजार कर्मचाऱ्यांना, सात केंद्रांवर देणार धडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:41 IST

या प्रशिक्षण उपक्रमांर्तगत मास्टर ट्रेनर प्रणाली राबविण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेचा व्यापक अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पडावी यासाठी सुमारे ५० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून सोमवारपासून सात केंद्रांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरिता तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.या प्रशिक्षण उपक्रमांर्तगत मास्टर ट्रेनर प्रणाली राबविण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेचा व्यापक अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे मास्टर ट्रेनर अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन निवडणूक प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची सविस्तर माहिती देतील. या माध्यमातून सक्षम, प्रशिक्षित व जबाबदार मनुष्यबळ निर्माण करण्यावर प्रशासनाचा विशेष भर आहे.दरम्यान, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण २९ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत सलग आणि ५ व ९ जानेवारीलाहोणार आहे. 

मतदान, मतमोजणी...आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतदान प्रक्रिया, मतमोजणी प्रक्रिया, कायदा व सुव्यवस्था तसेच तक्रार निवारण, यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश या प्रशिक्षण वर्गात आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोर पालन कसे करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Election process training starts today for 50,000 employees.

Web Summary : Mumbai's municipal corporation will train 50,000 employees for smooth, fair elections. Training covers voting, counting, code of conduct, and grievance redressal at seven centers.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६निवडणूक 2026मुंबई महानगरपालिका