ट्रेलर कारमध्ये घुसला, एक ठार
By Admin | Updated: March 24, 2015 00:50 IST2015-03-24T00:50:20+5:302015-03-24T00:50:20+5:30
रविवारी रात्री वेगवान ट्रेलरने इंडिका कारला चिरडून झालेल्या अपघातात कारमध्ये बसलेल्या एका २८ वर्षीय बीपीओ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

ट्रेलर कारमध्ये घुसला, एक ठार
मुंबई : रविवारी रात्री वेगवान ट्रेलरने इंडिका कारला चिरडून झालेल्या अपघातात कारमध्ये बसलेल्या एका २८ वर्षीय बीपीओ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्याचा पुढच्या महिन्यात साखरपुडा होता. हा अपघात कांदिवली पूर्व परिसरात असलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडला. मुख्य म्हणजे या भयंकर अपघातात कारच्या चालकाचा हात फ्राक्चर झाला असून तो बचावला आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी ट्रेलरच्या चालकाला निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे.
मालाड पूर्व परिसरात बाणडोंगरी परिसरात असलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर रात्री ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडल्याचे समतानगर पोलिसांनी सांगितले. ज्यात वीरेंद्र दमानिया या तरु णाचा मृत्यू झाला. दमानिया हा कांदिवलीमध्ये भाडे तत्त्वावर आपल्या एका रु ममेट सोबत राहत होता. तो मूळचा गुजरातचा राहणारा असून त्याचे कुटुंब दमण याठिकाणी राहते. तो गोरेगावमध्ये एका बीपीओत काम करत होता. त्याच्या कंपनीने इंडिका गाडी भाडेतत्त्वावर घेतली होती . अपघात घडला, तेव्हा कारचा चालक रमेश यादव आणि दमानिया हे दोघेच या कारमध्ये होते. कारमध्ये दमानिया हा यादवच्या बाजूला बसला होता. त्यावेळी हा ट्रेलर या कारमध्ये जाऊन घुसला. यादवला कारमधून बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाला एक तास लागला. क्र ेनच्या मदतीने त्याला आणि दमानियाला बाहेर काढून त्यांना शताब्दी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यात दमानियाला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर यादवच्या हाताला फ्राक्चर झाल्याने त्याचावर उपचार सुरु आहेत. स्थनिक लोक मारतील, या भीतीने ट्रेलरचा चालक सुरेंद्र बर्मे (३०) हा क्लिनरसह घटनास्थळाहून गायब झाला होता. समतानगर पोलिसांनी नंतर त्याला अटक केली. मूळचा जम्मू काश्मीरचा रहिवासी असलेला बर्मे हा अपघाताच्या वेळी नशेत होता का? याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)