साखळदंड तुटल्याने टे्रलरचे पाइप रस्त्यावर
By Admin | Updated: October 8, 2014 01:24 IST2014-10-08T01:24:36+5:302014-10-08T01:24:36+5:30
हे पाईप पडू नयेत, यासाठी लावलेला साखळदंड फुडलँड, रोडपाली चौकात तुटून जवळपास २० पाईप रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्यामुळे तब्बल अडीच तास वाहतूक कोंडी झाली

साखळदंड तुटल्याने टे्रलरचे पाइप रस्त्यावर
तळोजा : पनवेल - ठाणे मार्गावर कळंबोली फुडलँड कंपनीच्या चौकात विचित्र घटना घडली. सकाळी ७.४५ वा. तळोजा लिंक रोड येथून मुंब्रा दिशेला जाणाया टे्रलरमध्ये (एमएच ०५ /एएम/१८९३) या गाडीत नियमापेक्षा जास्त लोखंडी पाईप भरलेले होते. हे पाईप पडू नयेत, यासाठी लावलेला साखळदंड फुडलँड, रोडपाली चौकात तुटून जवळपास २० पाईप रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्यामुळे तब्बल अडीच तास वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कल्याणहून पनवेलकडे जाणाया एसटीचे मात्र यात नुकसान झाले.
मोठमोठे कंटेनर, टे्रलर, ट्रकमधून सर्रास लोखंडी, सळया, पाईप याशिवाय वजनदार अशा वस्तू यामधून वाहतूक करून नेण्यात येतात. मात्र वाहनांच्या वर्दळीत शिवाय वेगात असलेल्या या वाहनांना कंट्रोल करणे शक्य नसल्याने अनेकदा अपघात होतच असतात. मंगळवारी सकाळीही असाच अपघात घडला.
हा अपघात घडल्यानंतर गाडीचे क्लिनर, ड्रायव्हर हे फरार असून त्यांचा कळंबोली पोलीस शोध घेत आहेत. (वार्ताहर)