घोणसे घाटात ट्रेलरचा अपघात

By Admin | Updated: February 26, 2015 22:42 IST2015-02-26T22:42:13+5:302015-02-26T22:42:13+5:30

दिघी पोर्टमध्ये कच्चा लोखंडाचा माल घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला म्हसळा-माणगाव मार्गावरील घोणसे घाटात बुधवारी भीषण अपघात झाला आहे.

Trailer accident in Ghonsee Ghat | घोणसे घाटात ट्रेलरचा अपघात

घोणसे घाटात ट्रेलरचा अपघात

म्हसळा : दिघी पोर्टमध्ये कच्चा लोखंडाचा माल घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला म्हसळा-माणगाव मार्गावरील घोणसे घाटात बुधवारी भीषण अपघात झाला आहे. यात ट्रेलरचालकाच्या केबिनचे मोठे नुकसान झाले आहे. तीन दिवसांमध्ये झालेला हा दुसरा अपघात असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
दिघी पोर्टमधून होणारी अवजड वाहतुकीला म्हसळेतील नागरिकांनी नेहमीच विरोध दर्शवला आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडून योग्य दखल घेण्यात येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे म्हसळ्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता दुरुस्तीकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात होतात.

Web Title: Trailer accident in Ghonsee Ghat