नियम धाब्यावर बसवून वाहतूक

By Admin | Updated: October 20, 2014 23:56 IST2014-10-20T23:56:01+5:302014-10-20T23:56:01+5:30

सायन-पनवेल महामार्गावर खाजगी वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे प्रवासी ने-आण केली जात आहे.

Traffic Route | नियम धाब्यावर बसवून वाहतूक

नियम धाब्यावर बसवून वाहतूक

तळोजा : सायन-पनवेल महामार्गावर खाजगी वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे प्रवासी ने-आण केली जात आहे. बऱ्याचदा हा प्रवास प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत असूनही वाहतूक शाखा याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे बेकायदा वाहतूक करणाऱ्या या वाहतूकदारांवर आवर घालणे कठीण होऊन बसले आहे.
सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली, कामोठा, खारघर, बेलापूर, वाशी, तुर्भेपर्यंत हे खाजगी वाहतूकदार सर्रासपणे प्रवासी ने-आण करतात. प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे तर सोडाच उलट वाहतूक दर धुडकावून अधिकाधिक किंमत आकारली जाते. याशिवाय एका वाहनात नियमांपेक्षा अधिक प्रवासी अक्षरश: कोंबले जाण्याची वाहतूकदारांत शर्यतच लागलेली असते. यात प्रवाशांनाच अधिक त्रास होत आहे. त्यामुळे जीवावर बेतणारा प्रवास करण्यापेक्षा प्रवाशांनीही या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे. परवानगीपेक्षा अधिक प्रवासी कोंबून चाललेली ही वाहतूक महिला प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तीन आसनाच्या परवानगीच्या जागी ४ प्रवासी बसवणे महिलांसाठी त्रासदायक ठरत आहे, मात्र वाहतूक पोलीस बघ्याच्या भूमिकेशिवाय कोणतीही कारवाई करेनासे झालेले आहेत.

Web Title: Traffic Route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.