ट्रक अपघातात वाहतूक पोलीस जखमी

By Admin | Updated: June 13, 2014 01:51 IST2014-06-13T01:51:53+5:302014-06-13T01:51:53+5:30

ड्युटी पूर्ण करून घरी निघालेले संदीप शिकदे (३९) हे पोलीस शिपाई ट्रकच्या धडकेत जखमी झाले.

Traffic Police injured in truck accident | ट्रक अपघातात वाहतूक पोलीस जखमी

ट्रक अपघातात वाहतूक पोलीस जखमी

मुंबई : ड्युटी पूर्ण करून घरी निघालेले संदीप शिकदे (३९) हे पोलीस शिपाई ट्रकच्या धडकेत जखमी झाले. काल पहाटे रहेजा उड्डाणपुलाजवळील केमकर चौकात ही घटना घडली. भरधाव ट्रक त्यांच्या पायावरून गेला. या अपघातात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. कोहिनूर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिकदे ताडदेव वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. पहाटे ड्युटी आटोपून ते माहीम पोलीस वसाहतीतील राहत्या घरी निघाले होते. त्यांची मोटारसायकल केमकर चौकात आली तेव्हा एक भरधाव ट्रक त्यांच्या दिशेने येत होता. ट्रकची धडक बसेल हा अंदाज बांधून त्यांनी मोटारसायकल मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकचा वेग इतका होता की पुढले चाक शिकदे यांच्या पायावरून गेले. यात त्यांच्या पायाला जबर मार बसला. अपघातानंतर ट्रकचालक त्याच वेगात पुढे निसटला. अपघाताची माहिती शिकदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिली. या प्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Traffic Police injured in truck accident