हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, मुंबईकडे येणा-या चाकरमान्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 10:00 IST2017-08-12T10:00:14+5:302017-08-12T10:00:39+5:30

टिळकनगर - चेंबूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Traffic disruption on Harbor rail route, coming to Mumbai | हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, मुंबईकडे येणा-या चाकरमान्यांचे हाल

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, मुंबईकडे येणा-या चाकरमान्यांचे हाल

मुंबई, दि. 12 - हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. टिळकनगर - चेंबूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे, मात्र यामुळे हार्बर रेल्वेचं टाईमटेबल बिघडलं आहे. रेल्वे रुळाला तडा गेला असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेन जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. सकाळची वेळ असल्याने मुंबईच्या दिशेने येणा-या चाकरमान्यांचे मात्र हाल होत आहेत. 

Web Title: Traffic disruption on Harbor rail route, coming to Mumbai