मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा

By Admin | Updated: June 19, 2015 02:52 IST2015-06-19T02:52:46+5:302015-06-19T02:52:46+5:30

मुंबई आणि उपनगरात गुरुवारी दिवसभर कोसळणाऱ्या जलधारांनी मुंबईचा वेग संथ केला. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Traffic detention due to heavy rain | मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा

मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा

मुंबई : मुंबई आणि उपनगरात गुरुवारी दिवसभर कोसळणाऱ्या जलधारांनी मुंबईचा वेग संथ केला. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक कोंडीने तर मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले. आणि पावसाच्या अडथळ्यामुळे लोकलाचाही वेग मंदावल्याने कोसळधारेचा फटका चाकरमान्यांना नेहमीप्रमाणेच बसला. मुंबई शहरात दिवसभरात पडलेल्या पावसाची ६०.३४ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ५७.४८ आणि पश्चिम उपनगरात ६४.९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात दिवसभराच्या पावसामुळे दादरमधील हिंदमाता, कुर्ला पश्चिमेकडील शीतल सिग्नल व कमानी सिग्नल, मिलन सब वे आणि सायन सबवे, माहीममधील आयनॉक्स टॉवर, डोंगरीमधील हनुमान निवास, पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील यारी रोड, सांताक्रूझमधील १० वा रस्ता आणि हसमुख नगर, मालाड पूर्वेकडील शांतीवन, अंधेरी येथील वीरा देसाई रोड येथे पाणी साचले होते. शहरात ११ ठिकाणी, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १९ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. वरळी ग्लॅक्सो कंपनी सिग्नलजवळ बस क्रमांक ८८ या बेस्ट बसवर झाड कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. शिवाय चेंबूरमध्येही झाडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. (प्रतिनिधी)दुर्घटना -दुपारी ३:०५ वाजता एलबीएस मार्गावरील गोल्डन हॉटेलजवळ घरावर प्लास्टिक घालण्यासाठी एक मुलगा वर चढला होता. टाटा पॉवरच्या वरून जाणाऱ्या हायटेंशन लाईनचा शॉक बसल्याने तो जखमी झाला. महेश असे त्याचे नाव असून, सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. -माहीममधील सिल्वेरा चाळीच्या जवळ असलेल्या कंपाऊंडची भिंत कोसळली. -नरिमन पॉईंटमधील शालीमार इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचा भाग कोसळला. या दुर्घटनेत नजीर शौकत अली शेख जखमी झाले.

Web Title: Traffic detention due to heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.