मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस वाहनांची गर्दी; दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा, अवजड वाहनांना महामार्ग पोलिसांचे आवाहन   

By नितीन जगताप | Published: December 23, 2023 06:50 PM2023-12-23T18:50:18+5:302023-12-23T18:50:30+5:30

  दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा असे वाहन महामार्ग पोलिसांनी अवजड वाहन मालकांना केले आहे.    

Traffic congestion on Mumbai Pune Expressway for three days Start traveling after 12 noon, highway police appeals to heavy vehicles |  मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस वाहनांची गर्दी; दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा, अवजड वाहनांना महामार्ग पोलिसांचे आवाहन   

 मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस वाहनांची गर्दी; दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा, अवजड वाहनांना महामार्ग पोलिसांचे आवाहन   

मुंबई : नाताळ सणानिमित्त शनिवार २३ ते सोमवार २५ डिसेंबर सलग सुट्ट्या आल्या आहेत शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी असल्याने मुंबईकर नाताळ साजरा करण्यासाठी बाहेरची वाट धरणार आहेत. त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर  दुपारी १२ नंतर प्रवास सुरु करा असे वाहन महामार्ग पोलिसांनी अवजड वाहन मालकांना केले आहे.    

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक)  डॉ. रवींद्र कुमार सिंगल  यांनी म्हटले आहे कि, सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते व वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात. मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले असता जड अवजड वाहने व कार हे सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत एकत्र आल्यानंतर वाहतूक कोंडी होते. तरी सर्व जड़ अवजड वाहन मालक/चालक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, या दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी १२ नंतर सुरू केल्यास आपला प्रवास सुरक्षित होईल. च वाहतूक कोंडीमुळे या वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिन चे काम निघणे इत्यादी टळू शकेल तसेच इंधन व वेळची बचत होईल.
 

Web Title: Traffic congestion on Mumbai Pune Expressway for three days Start traveling after 12 noon, highway police appeals to heavy vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.