'एक्सप्रेस वे' वर अपघात शिवनेरीची ट्रकला धडक
By Admin | Updated: August 28, 2016 08:24 IST2016-08-28T08:24:24+5:302016-08-28T08:24:24+5:30
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर तळेगाव टोलनाक्याजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला.

'एक्सप्रेस वे' वर अपघात शिवनेरीची ट्रकला धडक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर तळेगाव टोलनाक्याजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने चाललेल्या शिवनेरी बसने मागच्याबाजूने ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. मध्यरात्री ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला.
तळेगाव टोलनाक्याच्या पुढे शिवनेरीने ट्रकला धडक दिली. जखमींना निगडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक्सप्रेस वे वरील वाढते अपघात रोखण्यासाठी ड्रोन कॅमे-याची मदत घेण्यात येणार आहे. शनिवारीच एक्सप्रेस वे वर ड्रोनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
आणखी वाचा
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर सातत्याने अपघात होत आहेत.विविध उपायोजना करुनही हे अपघाताचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे एक्सप्रेस वे वरील बेशिस्त रोखण्यासाठी आता ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. मागच्या काही आठवडयात रविवारी रात्रीच्या सुमारासच एक्सप्रेस वे वर अपघात झाले आहेत.