Join us  

दसरा मेळाव्यासाठी ट्रॅफिकमध्ये बदल; सुरक्षेसाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 5:23 AM

वाहतूक पोलिसांनी ५ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले आहेत.

लोकमत  न्यूज नेटवर्क 

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे यंदा प्रथमच दसऱ्याला दोन मेळावे होत आहेत.  दोन्ही गट आपल्या मेळाव्यात विक्रमी गर्दी होईल, असा दावा करत असल्याने पोलिसांवरील ताणही वाढणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

या दोन्ही मेळाव्यांना मुंबईसह राज्यातील वेगवेगळया भागातून शिवसैनिक येणार आहेत. परिणामी  मुंबई पोलिसांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर, तसेच कार्यक्रम स्थळी जाण्याच्या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी ५ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले आहेत.

शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी बदल

वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते:-- स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते एस बँक सिग्नलपर्यंत.- केळूस्कर रोड (दक्षिण) आणि (उत्तर).- एम. बी. राऊत मार्ग हा एस. व्ही. एस. रोडपर्यंत.- पांडुरंग नाईक मार्ग हा एम. बी. राऊत रोडपर्यंत.- दादासाहेब रेगे मार्ग हा सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौकपर्यंत.- दिलीप गुप्ते मार्ग हा शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शीतलादेवी रोडपर्यंत.- एन. सी. केळकरमार्ग हा हनुमान मंदिर ते गडकरी चौकपर्यंत.- एल. जे. रोड हा राजा बडे सिग्नल ते गडकरी जंक्शनपर्यंत.

वाहनांना प्रवेश बंदी असलेले आणि पर्यायी मार्ग 

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शनपर्यंत बंद.पर्यायी मार्ग :- सिद्धिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.

राजाबढे चौक जंक्शन ते केळूस्कर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत बंद 

पर्यायी मार्ग :- एल. जे. रोड, गोखले रोड- स्टीलमॅन जंक्शनवरून पुढे गोखले रोडचा वापर करतील.दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी बंद.

पर्यायी मार्ग - राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.

वाहनांची पार्किंग व्यवस्था

कारसाठी पार्किग  इंडिया बुल फायनान्स सेंटर सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टर रोड, कोहिनूर स्क्वेअर कोहिनूर स्क्वेअर, कोहिनूर मिल कॅम्प. दादरबसेससाठी पार्किग   पाच गार्डन माटुंगा नाथालाल पारेख मार्ग, एडनवाला रोड, आर. ए. के. रोड, चार रस्ता वडाळा, लेडी जहांगीर रोड, माटुंगा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :दसरामुंबई