पश्चिम द्रुतगती मार्गावर मेट्रो-७साठी वाहतुकीत बदल

By Admin | Updated: June 14, 2017 02:30 IST2017-06-14T02:30:01+5:302017-06-14T02:30:01+5:30

अंधेरी ते दहिसर यादरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रो-७ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. महामार्गाच्या या पट्ट्यात ‘यू’ गर्डर लाँचिंगच्या कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Traffic change for Metro-7 on Western Expressway | पश्चिम द्रुतगती मार्गावर मेट्रो-७साठी वाहतुकीत बदल

पश्चिम द्रुतगती मार्गावर मेट्रो-७साठी वाहतुकीत बदल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी ते दहिसर यादरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रो-७ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. महामार्गाच्या या पट्ट्यात ‘यू’ गर्डर लाँचिंगच्या कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
१७० मेट्रीक टन वजन असलेल्या गर्डर लाँचिंगच्या वेळेदरम्यान रात्री ११.३० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाँचिंगच्या नियोजित ठिकाणापासून ५०० ते ७०० मीटर आधी महामार्गावरील उत्तर दिशेने जाणारी वाहतूक दक्षिण वाहतूक मार्गिकेवर वळवण्यात येणार आहे. लाँचिंगदरम्यान दहिसरकडे जाणारी वाहतूक महामार्गाच्या दोन मार्गिकांवरून जाईल. तर दहिसरकडून अंधेरीकडे येणारी वाहतूक महामार्गाच्या तीन मार्गिका वापरेल. महामार्गावरील वाहतूक कोणत्याही वेळी पूर्णपणे बंद असणार नाही, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Traffic change for Metro-7 on Western Expressway