चेंबर्समुळे वाहतुकीला अडथळा
By Admin | Updated: October 7, 2014 00:09 IST2014-10-07T00:09:10+5:302014-10-07T00:09:10+5:30
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यालगत ठिकठिकाणी वळणावर असलेले सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर्स वाहनचालकांबरोबर कामगार वर्गाला रहदारीसाठी अडथळा ठरत आहेत

चेंबर्समुळे वाहतुकीला अडथळा
धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यालगत ठिकठिकाणी वळणावर असलेले सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर्स वाहनचालकांबरोबर कामगार वर्गाला रहदारीसाठी अडथळा ठरत आहेत. या चेंबर्समुळे वळणावरील समोरील वाहन न दिसल्यामुळे कित्येक अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून मात्र संबंधित प्रशासनाचा याकडे मात्र कानाडोळा झाल्याचे दिसून येत आहे.
औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांलगत वळणावर जागोजागी असलेल्या सांडपाणी वाहिन्यांचे सिमेंटचे चेंबर्स अवजड वाहनांना रहदारीला अडथळा ठरत असून वाहन चालकांना मात्र याची चांगलीच डोकेदुखी होऊन बसले. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा बाजूला असलेल्या या चेंबर्समुळे वळणावर जागोजागी अवजड वाहनांना वळण घेत असताना वाहनचालकांना याचा त्रास होत असल्याचे दिसते. किमान ४ ते ५ फूट उंच असलेल्या चेंबर्समुळे या औद्योगिक वसाहतीत रहदारी करताना वळणावर समोरील वाहन नजरेस न आल्यामुळे कित्येक अपघात घडल्याचे ऐकावयास मिळते. तर येथील लहान मोठ्या अपघातांमुळे अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे.