Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा ते चेंबूर आज मध्यरात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:09 IST

स्कॉयवॉक पाडण्यासाठी मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ७ आणि ८ वरील जीर्ण झालेले स्कॉयवॉक पाडण्यात येणार आहे. यासाठी हार्बर मार्गावर वडाळा ते चेंबूर आज मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवेत बदल करण्यात आले आहेत. वडाळा स्थानकातून मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांनी बेलापूरला सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटीहून मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी पनवेलला सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. पनवेलहून मध्यरात्री ११ वाजून ३६ मिनिटांनी वडाळा रोडसाठी सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. पनवेलहून मध्यरात्री १२ वाजून ०३ मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटीहून रात्री१० वाजून ६ मिनिटांला सुटणारी पनवेल लोकल बेलापूर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. बेलापूर ते पनवेल लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. 

टॅग्स :मध्य रेल्वे