Join us

पारंपरिक, सेल्फ फायनान्सचा कटऑफ गेला नव्वदीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 06:50 IST

पहिली गुणवत्ता यादी जाहीर; ८५ ते ९० टक्क्यांचे विद्यार्थी प्रतीक्षेत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या पदवीपूर्व प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली असून, यंदाही अनेक नामांकित महाविद्यालयांचा कटऑफ यंदाही नव्वदीपार गेल्याचे चित्र आहे. यंदा कटऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत एक ते दोन टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. सेल्फ फायनान्सला विद्यार्थ्यांची चांगली पसंती मिळत आहे.सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांसोबत आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे अनेक नामांकित महाविद्यालयांचा या अभ्यासक्रमांसाठीचा कटऑफ नव्वदीपार आहे. यंदाही कॉमर्स शाखेकडे वळणाºया विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून, पारंपरिक अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.सेल्फ फायनान्सव्यतिरिक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी सीए (चार्टर्ड अकाउंटंट), सीएस (कंपनी सेक्रेटरी) यांसारख्या अन्य उत्तम पर्यायांचाही विचार करावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. बीबीआय (बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स), बीएएफ (बॅचलर इन अकाउंटिंग अँड फायनान्स), बीएफएम (बॅचलर इन फायनान्स मार्केट) यांसारखे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांची पसंती मिळवित आहेत.पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा या अभ्यासक्रमांमुळे व्यवसायभिमुख प्रशिक्षण मिळत असल्याने त्यांच्याकडे ओढा वाढत आहे. नामांकित महाविद्यालयांच्या पारंपरिक आणि सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांचा कटऑफ नव्वदीपार गेल्याने, ८० ते ९० टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांना साहजिकच आता दुसºया गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे.मुंबई विद्यापीठांतर्गत येणाºया नामांकित महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी :मिठीबाई महाविद्यालयबीए - ९६ %बी.कॉम-८९.६९%बीएमएसआर्टस् - ९१.१७%कॉमर्स ९५.६० %सायन्स - ९१.६७ %बीएमएमआर्ट्स- ९४.६७ %कॉमर्स -९३.४० %सायन्स -९२.१७%बीएएफ ( बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स)आर्टस् -९५.२० %रुईया महाविद्यालयबीए - ९५.८%बी.एससी - ८६.३१ %बीएमएमआर्टस्-९३.२ %कॉमर्स- ९०.८ %सायन्स - ९३.६%विल्सन महाविद्यालयबीएमएसआर्टस्- ८७.७ %कॉमर्स- ९२.४%सायन्स- ९०%बीएमएमआर्टस् - ९३%कॉमर्स ९३.६ %सायन्स - ९०.६%बीए - ८५%बी.एससी - ७०%झेवियर्स महाविद्यालयबीए - ९२.३१%बीएससी (आयटी)-९५%बीएससी ( बायलॉजीकल सायन्स )- ७७.८%बीएमएस - ८०.१३%बीएमएम - ८१.८८%एच आर कॉलेजबी कॉम - ९६%आर्टस्- ९४.२०%कॉमर्स- ९३.२०%सायन्स - ९२%बीएमएसआर्टस्- ९०.४०%कॉमर्स - ९५.६०%सायन्स - ९१.४० %रुपारेल कॉलेजबी कॉम - ८२. ७६ %आर्टस्- ७६ . ४६%कॉमर्स - ८४ . ०३ %