पर्यटकांनी केली मुरूड, जंजि-यात गर्दी

By Admin | Updated: November 10, 2014 00:12 IST2014-11-10T00:12:03+5:302014-11-10T00:12:03+5:30

मुरुड-जंजिरा, काशिद बीच, दिवेआगर गेल्या दोन दिवसांत पर्यटकांनी गजबजले असून समुद्र किना-यावर अक्षरश: गर्दी लोटली आहे.

The tourists did the murud, the dawn-the crowd | पर्यटकांनी केली मुरूड, जंजि-यात गर्दी

पर्यटकांनी केली मुरूड, जंजि-यात गर्दी

मुरुड : मुरुड-जंजिरा, काशिद बीच, दिवेआगर गेल्या दोन दिवसांत पर्यटकांनी गजबजले असून समुद्र किना-यावर अक्षरश: गर्दी लोटली आहे. सलग जोडून सुट्या आल्यामुळे पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबईसह हौशी लोकांनी जंजिऱ्यात हजेरी लावली आहे. मासळी मार्केटमध्ये ही ताजी कोळंबी, रावस, सुरमई, बांगडा, पापलेट खरेदीसाठी खोक्यांना तसेच बर्फाला मागणी वाढली आहे.
जंजिऱ्यासारखा पदम्दुर्ग ही पर्यटकांसाठी खुला का केला जात नसल्याची विचारणा किनाऱ्यावर ऐकायला मिळते. लॉजिंग तसेच खाणावळीत खासकरून समुद्र किनाऱ्यावर वर्दळ वाढली आहे. हातगाड्यांवरील पाणीपुरी, भेळपुरी, चायनीज तसेच शहाळी आदिंवर खवय्यांची गर्दी आहे.
समुद्रावर घोडागाडी, उंट सफर तसेच पॅरासिलिंगचे थ्रील अनुभवताना बच्चे कंपनीसह उत्साहाचे वातावरण दिसते.
समुद्रकिनारी आनंद लुटताना, तसेच सूर्यास्ताचा मोहक नजारा पहात कॅमेऱ्यात बंदिस्त करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. (वार्ताहर)

Web Title: The tourists did the murud, the dawn-the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.