नांदगाव बीचलाही पर्यटकांची पसंती
By Admin | Updated: December 31, 2014 22:17 IST2014-12-31T22:17:33+5:302014-12-31T22:17:33+5:30
मुरुड व काशीदच्या तुलनेत शांत आणि सुरक्षित असलेल्या नांदगावच्या समुद्र किनाऱ्यावरही पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

नांदगाव बीचलाही पर्यटकांची पसंती
नांदगांव : मुरुड व काशीदच्या तुलनेत शांत आणि सुरक्षित असलेल्या नांदगावच्या समुद्र किनाऱ्यावरही पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
मुरुडच्या एकदरा खाडीत अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत, तर काशीद बीचवरही पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वर्षभरात घडल्या आहेत. त्यामानाने नांदगावचा बीच सुरक्षित आहे. पोहण्यासाठी उथळ व अत्यंत सुरक्षित असलेला हा परिसर नारळ, सुपारीच्या बागांमुळे झाकून गेला आहे.
मुरुड - अलिबाग रस्त्यापासून दूर असलेल्या हा किनारा आता हळूहळू प्रसिध्दीच्या झोतात येत असून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नूतन वर्षाचे स्वागतासाठी या किनाऱ्याला पर्यटकांची पसंती मिळत आहे. याठिकाणीचे श्री सिध्दीविनायक मंदिरासह, भवानीदेवी मंदिर, वाघोबा मंदिर, फणसाड अभयारण्य पर्यटकांना विशेष आकर्षित करीत आहेत.
च्रेवदंडा : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रेवदंडा परिसरात पर्यटकांनी हजेरी लावली होती. बुधवार सुट्टीचा वार नसल्याने कुटुंबापेक्षा बाईकवाल्यांची गर्दी जाणवत होती. बाजारपेठेतील रस्त्यावर वाहनांची वर्दळीने वाहतूक कोंडी झाली. दिवसभर हवामान ढगाळ असताना नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी स्थानिक नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते.
च्उपाहारगृहांनी विविध प्रकारच्या थाळी ठेवल्या होत्या. भेळपुरी, पाणीपुरी यांच्या हातागाड्यांभोवती पर्यटकांनी गराडा घातला होता. आईस्क्रिमच्या दुकानात गर्दी होती. विविध नाक्यावर कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची यंत्रणा सज्ज दिसत होती.