Join us  

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 6:32 PM

Tourism Minister Aaditya Thackeray test positive for covid-19: संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहन

मुंबई: पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली. त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. कायम मास्क घालण्याचं आणि स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे. (Tourism Minister Aaditya Thackeray test positive for covid-19)माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असं आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गेल्या ६ दिवसांत मुंबईत १३ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात शहरात ३ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. फेब्रुवारीच्या मध्यपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. गेल्या संपूर्ण वर्षात कधीही शहरात दिवसभरात ३ हजार रुग्ण आढळून आले नव्हते. मात्र शुक्रवारी मुंबईत ३ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. 

टॅग्स :आदित्य ठाकरे