थोडक्यात बातम्या.....एकूण ८ बातम्या.....
By Admin | Updated: August 28, 2014 23:09 IST2014-08-28T23:09:50+5:302014-08-28T23:09:50+5:30
संक्षिप्त.....

थोडक्यात बातम्या.....एकूण ८ बातम्या.....
स क्षिप्त.....बेस्ट देयक भरणाकेंद्रांबाबत सूचना मंुबई: गौरी-गणपती विसर्जनानिमित्त गुरुवारी ०४ सप्टेंबर आणि विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रातील बेस्टची सर्व वीजदेयक भरणा केंद्रे सकाळी ११ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तसेच या दोन्ही दिवशी दुपारच्या सत्रातील वीजदेयक भरणा केंद्रे व फिरते वीजदेयक भरणा वाहनेही बंद राहणार आहेत. २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान लालबाग वीजदेयक भरणा केंद्र दोन्ही सत्रात बंद राहणार आहे. कुलाब्यातील ईलेक्ट्रिक हाऊस व वडाळा बस डेपोतील ॲन्सिलरी बिल्डिंग ही वीजदेयक भरणा केंद्रे नेहमीप्रमाणे सुरु राहणार असल्याचे बेस्टकडून कळवण्यात आले आहे. ..............................................................................कोकणविकास आघाडीची सरकारवर टीका मंुबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वच्छ प्रतिमेचे असले तरी त्यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. महागाई, गुंडगिरी, भ्रष्टाचारामुळे जनता वैतागली आहे. सरकारचा नोकरशहांवर अंकुश राहिलेला नाही. सरकारला या गोष्टींचा लोकसभेत फटका सुद्धा देखील बसला. पण तरीदेखील प्रशासन व राज्यकर्ते अजून जागे झालेले नसल्याचे कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी म्हटले आहे. ..............................................................................आरोग्य सेविकांचा महापालिकेविरोधात मोर्चा मंुबई : आरोग्य सेविकांना महापालिकेत कायम करुन त्यांना कायम कर्मचार्यांप्रमाणे सर्व-सुविधा लागू कराव्यात, या मागणीसाठी आरोग्य सेविकांनी पालिक ा मुख्यालयासमोर आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता. आरोग्य सेविकांना दरमहा १० हजार पगार देण्याच्या ठरावास महापालिकेने मान्यता दिली आहे. पण, या ठरावाची अंमलबजावणी विधानसभा आचारसंहितेपूर्वी झालीच पाहिजे, या मागणीसाठी कामगारनेते ॲड. महाबळ शेी यांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या शिष्टमंडळाने महापौर सुनील प्रभू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन महापौर प्रभू यांनी दिले आहे...............................................................................निर्धारित तारखेआधी आयकर भरा!मंुबई - आयकर दात्यांनी आयकर भरणा निंर्धारित तारखेच्या आधी करावा, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे. करदाते एजन्सी बँक ांच्या निवडक शाखा किंवा कर भरण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या ऑन-लाईन सुविधेचा वापर करु शकतात, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. .............................................................................तांडेल राष्ट्रवादीतून शिवसेनेत !मंुबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्षे प्रदेश सरचिटणीस पदावर काम करणारे व मच्छिमारांचे ज्येष्ठ नेते दामोदर तांडेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी दक्षिण मंुबईचे खा. अरविंद सावंत, पांडूरंग सकपाळ व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. .............................................................................. विज्ञान, कथाकथन कार्यक्रम राजापूर: आपण विज्ञान युगात आहोत. त्यामुळे बुवाबाजीवर विश्वास न ठेवता विज्ञानाची कास धरावी, असे प्रतिपादन प्रसिद्घ नाट्यलेखक अशोक हसोळकर यांनी विज्ञान कथाकथन या एकपात्री नाट्यविष्काराच्या वेळी केले. हा कार्यक्रम राजापुर येथील वडदहसोळ माध्यमिक विद्यालयात झाला. यावेळी मुख्याध्यापक आनंद बावधानकर, शिक्षक दिनेश मासये, सागर पाटील, शिक्षिका रेषा चराटकर, वैजयंती खोबरेकर यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ..................................................................................शेतकर्यांच्या पेन्शनसाठी जनता दल आग्रही मंुबई - शेतकर्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राज्य सरकारतर्फे पेन्शन देण्यात यावे, अशी मागणी जनता दलाने केली आहे. शेतकरी दिनाच्या निमिंत्ताने ६० वर्षांवरील प्रत्येक शेतकर्यास दरमहा २ हजारांचे पेन्शन मिळावे, अशी मागणी जनता दल (से)चे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. रेवण भोसले यांनी केली आहे. ..............................................................................सीमाप्रश्नी ठाकरे मोदींना भेटणारमुंबई: कर्नाटकातील पोलिसांनी सीमा भागातील मराठी बांधवांवर झालेल्या अमानुष अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी सीमा भागातील शिष्टमंडळ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटले. आता त्यांच्या मागण्या घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शिवसेनेच्या १८ खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सीमा भागातील शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. सीमाभागातील शिष्टमंडळ आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या बैठकीत सीमा भागातील माजी आमदार वसंत पाटील, दिगंबर पाटील, विद्यमान आमदार संभाजी पाटील, न्यायालयात बाजू मांडणारे सरकारी वकील ॲड. साळवे यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी आणि शिवसेना नेते आ. दिवाकर रावते उपस्थित होते...............................................................................