तृतीयपंथी होण्यासाठी तरुणावर अत्याचार

By Admin | Updated: January 14, 2017 07:17 IST2017-01-14T07:17:41+5:302017-01-14T07:17:41+5:30

तृतीयपंथी होण्यासाठी २२ वर्षांच्या तरुणाचे लिंग छाटून त्याला एका खोलीत डांबल्याची धक्कादायक घटना माहीम येथे उघडकीस

Torture to the youth to become a third man | तृतीयपंथी होण्यासाठी तरुणावर अत्याचार

तृतीयपंथी होण्यासाठी तरुणावर अत्याचार

मुंबई : तृतीयपंथी होण्यासाठी २२ वर्षांच्या तरुणाचे लिंग छाटून त्याला एका खोलीत डांबल्याची धक्कादायक घटना माहीम येथे उघडकीस आली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून माहीम पोलिसांनी दोघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. तो पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलासोबत बिहारला राहतो. सहा महिन्यांपूर्वी त्याची गुजरातला एका कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथी असलेल्या शबीना आणि संजना यांच्यासोबत भेट झाली. तक्रारदार हा डान्सर आहे.
त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तो माहीम येथे राहत असलेल्या शबीना आणि संजनासोबत राहत होता. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार एकदा दोघांनीही त्याला दारू पाजल्याने त्याची शुद्ध हरपली. सकाळी तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला खोलीत डांबून दोघी पसार झाल्या होत्या. त्यांनी तृतीयपंथी दिसण्यासाठी आपले लिंग छाटल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला तरुणाच्या आलेल्या कॉलनंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपींच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार तरुणाने १ जानेवारी रोजी रायपूर येथे शस्त्रक्रिया करून घेतली. त्यावर देखरेख ठेवण्याचे काम आम्ही करत होतो. या प्रकरणी माहीम पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Torture to the youth to become a third man