नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:05 IST2020-12-08T04:05:09+5:302020-12-08T04:05:09+5:30

भिवंडी : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच एका नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या ...

Torture on a nine-year-old speeding Chimurdi | नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर अत्याचार

नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर अत्याचार

भिवंडी : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच एका नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना धामणकर नाका परिसरात शनिवार, ५ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

इम्रान इब्राहिम शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी वरच्या मजल्यावर राहत होता. पीडित चिमुरडी ही एक वर्षाची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी असल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली. याच बाबीचा नराधम आरोपीने गैरफायदा घेत पीडित चिमुरडीस घरात कोणी नसताना पहिल्या माळ्यावर बोलावले. चिमुरडीच्या बालवयाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. वेदना असह्य झाल्याने पीडित चिमुरडी घराशेजारीच रडत बसली असताना शेजारील महिलेले तिची विचारपूस करून फोनद्वारे इम्रान शेख याने मुलीवर अत्याचार केल्याची खबर चिमुरडीच्या आईस दिली. आईने घरी धाव घेत मुलीकडे विचारणा केल्यानंतर घडलेला प्रकार समजल्यावर मुलीच्या आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नराधम इम्रान शेख याच्याविरोधात पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.

Web Title: Torture on a nine-year-old speeding Chimurdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.