डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By Admin | Updated: June 25, 2014 17:22 IST2014-06-25T03:12:52+5:302014-06-25T17:22:01+5:30
डोंबिवलीत एका युवकाने गुंगी येणारे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
>डोंबिवली : एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्याच मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. पूर्वेकडील सुदामानगर येथे राहणारी तरूणी सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दूध आणण्यास बाहेर पडली असता तिला तिचा एक मित्र भेटला. आपला वाढदिवस आहे असे सांगत त्याने तिला गुंगी येणारे औषध घातलेले शीतपेय प्यायला दिले व त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ती मुलगी शुद्धीवर आल्यावर तिला आपण एका निर्जस्थळी बेंचवर पडल्याचे आढळले. घरी जाऊन तिथे घडलेला प्रकार कथन केल्यावर पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली
दरम्यान त्या मुलीला डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय चाचणीदरम्यान तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कार्तिकेन या युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.