Join us

दिवा स्थानकावर आज रात्रकालीन विशेष पॉवर ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 14:43 IST

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवार, १६ फेब्रुवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवार, १६ फेब्रुवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळेदरम्यान पुलाचे गर्डन टाकण्याचे काम केले जाणार आहे. परिणामी, वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले आहेत.१७ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटणारी ५०११९ दिवा-पनवेल पॅसेंजर आणि पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांची ५०१२० पनवेल-दिवा पॅसेंजर या गाड्या रद्द केल्या आहेत. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी येणारी ५०१०६ सावंतवाडी-दिवा पॅसेंजर गाडी पनवेल स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे. तर ५०१०५ दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी रविवारी सकाळी ७.१३ वाजता पनवेल स्थानकातून सोडण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान १२१३४ मँगलोर जंक्शन-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आल्यामुळे ही गाडी ५० मिनिटे उशिराने मुंबईत दाखल होईल.

टॅग्स :लोकलमुंबई लोकलमध्य रेल्वे