महावितरणविरोधात उद्या तलासरी बंद
By Admin | Updated: November 28, 2014 22:52 IST2014-11-28T22:52:23+5:302014-11-28T22:52:23+5:30
भारनियमन, वापरापेक्षा जास्त विद्युत बिले, तलासरी भागातील वीजचोरीला वीज कर्मचा:यांचेच अभय यांच्या निषेधार्थ शनिवारी तलासरीतील व्यापा:यांकडून बंद पाळण्यात येणार आहे.

महावितरणविरोधात उद्या तलासरी बंद
तलासरी : तलासरीत महावितरणच्या मनमानी कारभारामुळे जनता हैराण झाली असून कमी दाबाचा वीजपुरवठा, अन्यायकारक भारनियमन, वापरापेक्षा जास्त विद्युत बिले, तलासरी भागातील वीजचोरीला वीज कर्मचा:यांचेच अभय यांच्या निषेधार्थ शनिवारी तलासरीतील व्यापा:यांकडून बंद पाळण्यात येणार आहे. यामध्ये सर्व बाजारपेठा, हॉटेल, पेट्रोलपंपही सहभागी होणार आहेत.
तसेच सकाळी 1क् वाजता व्यापारी व नागरिक महावितरणच्या तलासरी कार्यालयावर धडक मोर्चा काढून महावितरणच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करणार आहेत.
या बंदमध्ये सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन तलासरी व्यापारी असोसिएशनने केले आहे.
(वार्ताहर)