उद्या एमआयडीसीचा पाणीपुरवठा २४ तास बंद
By Admin | Updated: December 31, 2014 22:54 IST2014-12-31T22:54:46+5:302014-12-31T22:54:46+5:30
शुक्रवारी, २ जानेवारी रोजी २४ तास ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.

उद्या एमआयडीसीचा पाणीपुरवठा २४ तास बंद
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीकडून केला जाणारा पाणीपुरवठा १५ दिवसांतून एकदा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शुक्रवारी, २ जानेवारी रोजी २४ तास ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.
धरणातील पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरावा यासाठी लघु पाटबंधारे विभागाने १५ दिवसांतून एकदा २४ तासांसाठी पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार १ जानेवारी २०१५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे एमआयडीसीकडून कळवण्यात आले आहे. त्याचबरोबर नव्या वषार्तील पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यासाठी २ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत पाणीकपात वाढविण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबईचा काही भाग, डोंबिवलीचा निवासी भाग, अंबरनाथ आदी ठिकाणांसह जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात पाण्याची चणचण भासू शकते अशी माहिती डोंबिवली एमआयडीसीचे अभियंता शंकर जगताप यांनी दिली. (प्रतिनिधी)
नव्या वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा बंद
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अत्यंत तातडीची निगा,देखभाल व आवश्यक दुरूस्ती करण्याकरीता नव्या वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्याच दिवशी (शुक्रवारी- शनिवारी) संपूर्ण दिवस शटडाऊन करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
ठाणे शहरातील कोलशेत, बाळकु म, वागळे इस्टेट, कळवा-विटावा, बेलापूर रोड, खारेगाव, मुंबई-पुणे रोड, मुंब्रा-कौसा इत्यादी ठिकाणी मंडळाचा होणार पाणी पुरवठा २ आणि ३ जानेवारी २०१५ रोजी २४ तासांसाठी बंद राहिल.
शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन ठामपा पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.