उद्या मुंबई विमानतळ सहा तास बंद, मान्सूनपूर्व कामांसाठी विमानतळ राहणार बंद 

By मनोज गडनीस | Published: May 8, 2024 05:28 PM2024-05-08T17:28:39+5:302024-05-08T17:29:06+5:30

या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील विमान सेवा पूर्णपणे बंद असेल, असे विमानतळ प्रशासनाने कळविले आहे. 

Tomorrow Mumbai airport will be closed for six hours, the airport will be closed for pre-monsoon work | उद्या मुंबई विमानतळ सहा तास बंद, मान्सूनपूर्व कामांसाठी विमानतळ राहणार बंद 

उद्या मुंबई विमानतळ सहा तास बंद, मान्सूनपूर्व कामांसाठी विमानतळ राहणार बंद 

मुंबई - मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने गुरुवारी (९ मे) मुंबईविमानतळावर देखभालीचे काम करण्यात येणार असून याकरिता मुंबई विमानतळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशा वेळेत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील विमान सेवा पूर्णपणे बंद असेल, असे विमानतळ प्रशासनाने कळविले आहे. 

मान्सूनमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसाळाच्या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील विमान प्रवास व सर्व सुविधा सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी हे देखभालीचे काम दरवर्षी करण्यात येते. या कामाची माहिती सर्व विमान कंपन्यांना सहा महिने अगोदरच देण्यात आली आहे. तसेच, ११ ते ५ या कालावधीमध्ये विमानसेवा तात्पुरती बंद राहणार असल्याने विमान कंपन्यांनी त्या अनुषंगाने आपल्या विमानांचे नियोजन करावे, असे देखील या कंपन्यांना सूचित करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुंबईतून विमान सेवा सुरळीत होणार आहे. तब्बल १०३३ एकरवर विमानतळ पसरले असून त्याची देखभाल करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Tomorrow Mumbai airport will be closed for six hours, the airport will be closed for pre-monsoon work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.