Join us  

टोमॅटो महागले, कांदा घसरला; डाळींच्या दरात घसरण, तुलनेत खरेदी झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 12:35 AM

- नितीन जगताप मुंबई : गेल्या काही दिवसात टोमॅटोची आवक कमी झाली असून त्यामुळे भाव २० रुपयांनी वाढले आहेत. ...

- नितीन जगताप मुंबई : गेल्या काही दिवसात टोमॅटोची आवक कमी झाली असून त्यामुळे भाव २० रुपयांनी वाढले आहेत. गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव वाढले होते, पण आता आवक वाढली असून प्रतिकिलो २० ते ३० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. सणासुदीला विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे किराणा मालाची मागणी वाढते. कोरोना काळात अनेकांच्या खिशाला झळ बसली आहे. त्यामुळे ग्राहक गेल्या वर्षीच्या तुलनेत खरेदी कमी करत आहेत. 

मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यातून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक सातारा,पुणे, सांगली कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. पावसामुळे या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली होती. आता परिस्थिती सुधारली, पण मालवाहतूक करणाऱ्या वाहणाऱ्या वाहनांची संख्या कमी असून  त्यामुळे काही भाज्यांची आवक कमी  होत आहे, तर काही ठिकाणी  वाहने जास्त आहेत. तेथील माल जास्त येत असे.

३५,मेथी ३० ते ३५, लालमठ ३०, चवळी ३० जुडी मिळत आहे. तर शेपू ५०,फरसबी  १००,वालं ८० रुपये किलो मिळत आहे. तर कांद्याची पात २०  ते ३० रुपये जुडी मिळत होती ती आता ५० रुपये जुडी मिळत आहे. १०० रुपये किलो मिळणारे कांदे आता ५० ते ६० रुपये किलो झाले आहेत. 

शेवगा १२०, पडवळ, टोमॅटो ८०, तोंडली ८०, मिरची १२० किलो दराने मिळत आहे. टोमॅटोचे दर १०० किलो होते त्यामध्ये घसरण होऊन ६० झाले होते, पण आता पुन्हा ८० रुपये झाले आहेत. ऐन दिवाळीत भाज्यांचे दर वाढले आहेत. 

गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळांची आवकही कमी झाली असून  मात्र दर स्थिर आहेत. त्यामुळे थोडा का होईना नागरिकांना दिलासा मिळेल.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई