छोटी वाहने टोलमुक्त करा
By Admin | Updated: July 7, 2014 23:25 IST2014-07-07T23:25:56+5:302014-07-07T23:25:56+5:30
राज्यात छोटी वाहने टोलमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

छोटी वाहने टोलमुक्त करा
नवी मुंबई : राज्यात छोटी वाहने टोलमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच खारघर येथे सुरु होणारा टोल रद्द करण्यासाठी तेथे झालेल्या कामाचा खर्च सिडकोने संबंधित कंत्रटदाराला द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. राज्यातील टोलच्या संदर्भातील आपली भूमिका लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वाशी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सायन - पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या मार्गाचे नुकतेच रुंदीकरण करण्यात आले आहे, तर या मार्गावर आवश्यक ठिकाणी पूल देखील उभारण्यात आले आहेत. यासाठी सुमारे 1229 कोटी रुपये खर्च झालेला आहे. हा खर्च वसुलीसाठी संबंधित कंत्रटदाराने खारघर येथे टोल नाका उभारणीला सुरुवात केली आहे.
अवघ्या तीन दिवसात तेथे टोल वसुलीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वीच या टोल नाक्याला स्थानिकांचा असलेला विरोध समोर आलेला आहे. या ठिकाणी अनेक राजकीय पक्षांनी टोलविरोधी आंदोलने देखील केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी हा टोल रद्द करण्याच्या अनुषंगाने सिडकोला पर्याय सुचवला आहे. सायन - पनवेल मार्गाचा बहुतांश भाग हा नवी मुंबई क्षेत्रत सिडको हद्दीत येतो. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी जो खर्च झाला असेल तो सिडकोने संबंधित कंत्रटदाराला द्यावा. तर मुंबईतील रस्त्याबद्दल उर्वरित 2 हजार कोटी रुपयांचा खर्च हा एमएमआरडीएने उचलावा, असेही त्यांनी सुचवले.
यासंदर्भात सिडको व एमएमआरडीएने एकत्रित बसून तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. असे झाल्यास खारघर येथील टोल रद्द होऊ शकेल व नागरिकांवर टोल लादणार नाही, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणो राज्यातील उर्वरित टोलही रद्द होऊ शकतात. राज्यात टॅक्सी, रिक्षा व खाजगी वाहने अशी छोटी वाहने टोलमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ व केंद्राचा टोल विभाग यांच्या समन्वयानेच हे शक्य होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री गणोश नाईक, आमदार संदीप नाईक, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी खासदार संजीव नाईक, महापौर सागर
नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये राष्ट्रवादीला 5क् टक्के जागा मिळाव्यात अशी अपेक्षा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. 2क्क्9 च्या निकषाचा विचार करून आपण या जागा मागत असून चर्चेतून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.