टोल माफी हवीच
By Admin | Updated: July 12, 2014 00:06 IST2014-07-12T00:06:49+5:302014-07-12T00:06:49+5:30
पनवेल : हल्लाबोल.. नो टोल.. अशा घोषणा देत शुक्रवारी काँग्रेस पक्षाने पनवेल-सायन महामार्ग रोखून धरला.

टोल माफी हवीच
पनवेल : हल्लाबोल.. नो टोल.. अशा घोषणा देत शुक्रवारी काँग्रेस पक्षाने पनवेल-सायन महामार्ग रोखून धरला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या या आंदोलनात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. टोलमाफी मिळेर्पयत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केली.
कामोठे वसाहतीतील काँग्रेस पक्ष कार्यालयापासून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलकांनी टोलविरोधात घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. कामोठय़ात नागरिक मोठय़ा संख्येने महामार्गावर उतरल्याने काही काळ वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. पोलिसांनी कळंबोली सर्कलजवळून वाहतूक दोन मार्गाने वळवली. हलकी वाहने मुंब्रा महामार्गावरून आरपीएफमार्गे वळविण्यात आली, तर अवजड वाहने जेएनपीटीमार्गे पाठविण्यात आली.
मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावर अवजड वाहने थांबविण्यात आल्याने वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. दुपारनंतर आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मांडला. जोर्पयत टोलमाफीची घोषणा होत नाही, तोर्पयत महामार्ग सोडणार नाही अशी भूमिका आंदोलनकत्र्यानी घेतली. त्यानंतर मोर्चेक:यांनी पुण्याकडे जाणारी वाहने अडवली. आंदोलनावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. पोलीस उपायुक्त संजयसिंह येनपुरे, विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूरही उपस्थित होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यांना मुख्यालयात आणून नंतर सोडून दिले. (वार्ताहर)
मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले होते. मात्र त्यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दूरध्वनीवरून प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भात त्यांनी शनिवारी बैठक बोलावली असून त्यामध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शुक्रवारी करण्यात आलेल्या रास्ता रोकोला स्थगिती देण्यात आली.
..तर आमदारकीचा राजीनामा देणार
मुख्यमंत्र्यांनी टोलबाबत 12 जुलै रोजी बैठक बोलावली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, अधिकारी आणि ठेकेदाराला बोलाविण्यात आले आहे. यावेळी सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आणि तसे झाले नाही तर जनतेच्या हितासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा आमदार ठाकूर यांनी दिला आहे.
कामोठय़ाला वाहनतळाचे स्वरूप
कामोठे वसाहतीतून मोर्चाला सुरुवात झाल्याने वसाहतीत मोठय़ा प्रमाणात वाहने उभी करण्यात आली होती. पक्षाच्या कार्यालयापासून चालत मोर्चेक:यांनी कोपरा टोलनाका गाठला. त्यामुळे अनेकांनी मुख्य रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी केली, परिणामी वसाहतीला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले होते.