शेलार येथे शौचालयाचा स्लॅब कोसळला
By Admin | Updated: April 10, 2015 22:56 IST2015-04-10T22:56:00+5:302015-04-10T22:56:00+5:30
भिवंडी शहरालगत कामवारी नदीच्या पात्राला लागून असलेल्या शेलार येथील एका शौचालयाचा स्लॅब बुधवारी सकाळी कोसळून एक जखमी झाला

शेलार येथे शौचालयाचा स्लॅब कोसळला
अनगाव : भिवंडी शहरालगत कामवारी नदीच्या पात्राला लागून असलेल्या शेलार येथील एका शौचालयाचा स्लॅब बुधवारी सकाळी कोसळून एक जखमी झाला असून उपचार करून त्यांना घरी पाठविल्याची माहिती पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एल.डी. पाटील यांनी दिली.
कामवरी नदीलगत बीओटी तत्वावर २००७ मध्ये पंधरा शौचालये बांधण्यात आली. मुंबईच्या एका संस्थेस त्याचा ठेका देण्यात आला होता. त्या शौचालयाच्या वापराचे कुठल्याही प्रकारचे भाडे घेतले जात नाही. ही घटना कळताच भिवंडीच्या अग्नीशामक दलास पाचारण करण्यात आले होते. आता याची दुरुस्ती कधी होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)