Join us

आरेतील स्वच्छतागृहाचे आमदार  ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण 

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 18, 2023 13:37 IST

लोकार्पण मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अॅड.आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रभाग क्रमांक ५२च्या माजी नगरसेविका प्रीति सातम सातत्याने पाठपुराव्यामुळे आरेवासीयांना स्वच्छतागृह मिळाले आहे. या आधुनिक स्वच्छतागृहामुळे परिसरातील जवळपास २ ते 3 हजार रहिवाश्यांना विशेषता महिला त्याचा लाभ होणार आहे. 

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरे यूनिट ७ मधील मद्रास पाडा येथे स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आली. त्याचे लोकार्पण मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अॅड.आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.गरिबांची सेवा करण्याचे काम  प्रिती सातम कायम करत आहेत असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.तर रहिवाश्यांनी प्रिती सातम यांचे मनापासून कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.

 याप्रसंगी भाजपा जोगेश्वरी विधानसभा अध्यक्ष अनंत परब व पदाधिकारी तसेच आरेतील शेकडो नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबईआशीष शेलार