गांजा आणि चरससह दोघांना अटक
By Admin | Updated: September 26, 2014 21:40 IST2014-09-26T21:40:40+5:302014-09-26T21:40:40+5:30
गांजा आणि चरससह दोघांना अटक

गांजा आणि चरससह दोघांना अटक
ग ंजा आणि चरससह दोघांना अटकमुंबई : परराज्यातून आणलेल्या अंमली पदार्थांची मुंबईत विक्री करणार्या दोन आरोपींना घाटकोपर अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी ७५० ग्रॅम चरस आणि ८ किलो गांजा हस्तगत केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशाच प्रकारे चेंबूर आणि साकीनाका परिसरात दोन इसम अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार या अधिकार्यांनी दोन पथके तयार केली. एका पथकाने चेंबूरच्या टिळकनगर परिसरात सापळा रचून शैलेंद्र कनोजिया (२८) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याजवळ असलेल्या बॅगेमध्ये ७५० ग्रँम चरस आढळून आले; तर दुसर्या पथकाने साकीनाका येथे सापळा रचून भिकाजी शाहू याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ पोलिसांना ८ किलो गांजा आढळून आला. दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)