‘कोरे’चे नॉन मान्सून वेळापत्रक आजपासून

By Admin | Updated: November 1, 2014 01:17 IST2014-11-01T01:17:49+5:302014-11-01T01:17:49+5:30

कोकण रेल्वेवर धावणा:या मेल-एक्सप्रेस गाडय़ांचे नॉन मान्सून वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. हे वेळापत्रकात 2014 च्या रेल्वे अर्थसंकल्पातील चार नव्या ट्रेनचाही समावेश केला आहे.

Today's Non-Monsoon Schedule | ‘कोरे’चे नॉन मान्सून वेळापत्रक आजपासून

‘कोरे’चे नॉन मान्सून वेळापत्रक आजपासून

मुंबई : कोकण रेल्वेवर धावणा:या मेल-एक्सप्रेस गाडय़ांचे नॉन मान्सून वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. हे वेळापत्रकात 2014 च्या रेल्वे अर्थसंकल्पातील चार नव्या ट्रेनचाही समावेश केला आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातील 22115/22116 एलटीटी ते करमाळी एसी एक्सप्रेस, 22414/22413 हजरत निजामुद्दीन ते मडगाव प्रीमियम एक्सप्रेस, 22654/22653 हजरत निजामुद्दीन आणि त्रिवेंद्रम एक्सप्रेस व्हाया कोट्टायाम, 22656/22655 हजरत निजामुद्दीन ते त्रिवेंद्रम एक्सप्रेस व्हाया अलाप्पे, 56666/56665 कासरगोड ते मोकांबिका रोड भाईंदर पॅसेंजर  ट्रेनचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
 
काही ट्रेनचे आगमन आणि प्रस्थानाची वेळ पुढीलप्रमाणो असेल
ट्रेनस्थानक               सध्याची वेळ   नवीन वेळ
12450 ह.निजामुद्दीन-मडगाव 
गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमडगाव (आगमन)13.1514.15
56640 मंगळूर -मडगाव पॅसेंजरमंगळूर (प्रस्थान)06.2005.50
मडगाव (आगमन)13.0012.30
56641 मडगाव-मंगळूर पॅसेंजरमडगाव (प्रस्थान)13.5013.00
10104 मडगाव-सीएसटी मांडवी एक्स.मडगाव (प्रस्थान)09.3009.15
10103 सीएसटी-मडगाव मांडवी एक्स.मडगाव (आगमन)18.4518.50
 
नव्या वेळापत्रकानुसार 12051 व 12052 
दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा शेवट 
1 नोव्हेंबरपासून करमाळी स्थानकात होईल. पावसाळ्यात वाढत्या अपघातांमुळे कोकण रेल्वेचा वेग मंदावतो. यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे मान्सून व नॉन मान्सून वेळापत्रक जाहीर केले जाते. 

 

Web Title: Today's Non-Monsoon Schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.