लोकमत पनवेल कार्यालयाचे आज उद्घाटन

By Admin | Updated: October 6, 2014 03:34 IST2014-10-06T03:34:59+5:302014-10-06T03:34:59+5:30

पनवेल येथे लोकमत मुंबई आवृत्तीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे

Today's inauguration of Lokmat Panvel office | लोकमत पनवेल कार्यालयाचे आज उद्घाटन

लोकमत पनवेल कार्यालयाचे आज उद्घाटन

पनवेल : पनवेल येथे लोकमत मुंबई आवृत्तीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ निरुपणकार दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याहस्ते सोमवार दिनांक ६ आॅक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले आहेत.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी चार वाजता मुख्य कार्यक्रम होणार असून यावेळी सुप्रसिध्द अभिनेते सचिन पिळगावकर उपस्थित राहणार आहेत. सकाळी आठ वाजता कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुमती वाजेकर प्रायमरी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी पनवेल शहरात वृक्षदिंडी काढून झाडे वाचवा झाडे जगवाचा संदेश पनवेलकरांना देतील. त्याचबरोबर या निमित्ताने मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात आले आहे. सायंकाळी वाचकांसाठी आनंद गाणी या कार्यक्रमाची मेजवानी ठेवण्यात आली आहे. यात मराठी गाणी व मिमिक्रीची धमाल पाहायला मिळणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Today's inauguration of Lokmat Panvel office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.