आज ग्रॅण्ड फिनाले!

By Admin | Updated: October 18, 2014 21:56 IST2014-10-18T21:56:20+5:302014-10-18T21:56:20+5:30

जिल्ह्यातील सहा मतदारसंघातल्या 58उमेदवारांपैकी सहा बाजीगर कोण? याचा फैसला रविवारच्या मतमोजणीद्वारे होणार असून लोकशाहीच्या या ग्रँडफिनालेची पूर्ण सज्जता झाली आहे.

Today's Grand Finale! | आज ग्रॅण्ड फिनाले!

आज ग्रॅण्ड फिनाले!

वसई :  जिल्ह्यातील सहा मतदारसंघातल्या 58उमेदवारांपैकी सहा बाजीगर कोण? याचा फैसला रविवारच्या मतमोजणीद्वारे होणार असून लोकशाहीच्या या ग्रँडफिनालेची पूर्ण सज्जता झाली आहे.  वसई मतदारसंघाची मतमोजणी माणिकपूर येथील सेंट ऑगस्टीन शाळा तर नालासोपारा मतदारसंघाची विरार पूर्वेस वर्तक हायस्कूलमध्ये करण्यात येणार आहे.  दुपारी बारा नंतर नेमके कोणते सहा उमेदवार विजयी झाले अथवा होतील हे  स्पष्ट होणार आहे.
 सहा मतदारसंघात 58 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रत बंद झाले आहे. रविवारी होणा:या मतमोजणीत कोण बाजी मारतो याकडे सुमारे 16 लाख 61 हजार मतदारांचे लक्ष लागले आहे. पालघर जिल्हयात एकुण 64.51 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान  पालघर मतदारसंघात झाले. येथील मताची टक्केवारी 68.64 इतकी राहीली. नालासोपारा मतदारसंघ वगळता इतर पाचही मतदारसंघात 6क् टक्क्याहून अधिक मतदान झाले.
 डहाणू येथे मार्क्‍स. कम्यु. पक्षाचे बारक्या मांगात, राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ चौधरी, शिवसेनेचे शंकर नम, भाजपाचे पास्कल धनारे, काँग्रेसचे रमेश पडवळ व मनसेचे विजय वाडीया या सहा जणांमध्ये लढत होत आहे.  विक्रमगड येथे भाजपाचे विष्णु सावरा, सेनेचे प्रकाश निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारा, काँग्रेसचे अशोक पाटील व मनसेचे भरत हजारे यांनी एकमेकांना आव्हान दिले आहे.  पालघर मतदारसंघात माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत असून त्यांना बविआच्या मनिषा निमकर, भाजपाचे डॉ. प्रेमचंद गोंड व सेनेचे कृष्णा घोडा यांचे आव्हान आहे. 131 बोईसर येथे बविआतर्फे विलास तरे, भाजपचे जगदीश धोडी, सेनेचे कमळाकर दळवी, काँग्रेसचे भुपेंद्र मढवी व मनसेचे वसंत रावते हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नालासोपारा येथे बविआचे क्षितीज ठाकूर, भाजपाचे राजन नाईक, सेनेचे शिरीष चव्हाण, काँग्रेसचे अशोक पेंढारी व मनसेचे विजय मांडवकर हे आपले नशीब आजमावीत आहेत.  वसई विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे संपुर्ण जिलचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात 65.5क् टक्के मतदान झाले. येथे हितेंद्र ठाकूर व विवेक पंडीत हे रिंगणात असून काँग्रेसचे मायकल फुटर्य़ाडोही आपले नशीब आजमावीत आहेत. ही लढत रोमहर्षक होण्याची शक्यता सर्वत्र व्यक्त होत आहे. वसई येथे मतमोजणीच्या एकुण 24 फे:या होतील त्याकरीता निवडणुक यंत्रणोने 6क् कर्मचारी तैनात केले आहेत. नालासोपारा येथे एकुण 29 फे:यांमध्ये मतमोजणी होईल व या मतमोजणीसाठी 15क् कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे वसईचे निवडणुक निर्णय अधिकारी दादा दातकर व नालासोपा:याचे मच्छींद्र सुकटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
मतमोजणी 
कडक बंदोबस्तात
पालघर  :येथील विधानसभा मतदारसंघातील  मतमोजणी केंद्रासमोरील 1क्क् मीटरचा भाग ना फेरीवाला क्षेत्र  म्हणून जाहीर करण्यात आला आहे. विजयी उमेदवारांच्या घोषणोनंतर होणा:या जल्लोषानंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी दिडशे पोलीस आधिका-यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पालघर निवडणूक निर्णय अधिकारी उमेश बिरारी यांनी दिली. पालघर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघातील 31क् मतदान केंद्रासाठी 14 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीची सुमारे 22 राऊंडस होणार आहेत. मतदान केंद्र निहाय मताची आकडेवारी जाहीर करण्याआधी तिरंगी, पंचरंगी, बहुरंगी लढती होण्याची शक्यता पाहता विजयाचे मताधिक्यात कमी तफावत राहणार असल्याच्या शक्यतेमुळे आकडेवारीची घोषणा करण्यास कुठलीही घाई न करण्याचे निर्देश निवडणुक आयोगाने दिल्याची माहिती बिरारी यांनी दिली. मतदान केंद्राच्या सभोवतालची 1क्क् मीटरचा भागात वाहनांना बंदी ठेवण्यात आली आहे. पालघरवरून बोईसरकडे जाणारी वाहतूक गोठणपुर, दांडेकर कॉलेज, मोरेकुरण, दापोली, उमरोळी अशी वळविली आहे.
 
 
पोलीस यंत्रणा सज्ज
4विधानसभेच्या बोईसर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या तारापुर इंडस्ट्रीयल मॅन्युॅफॅरर असोसिएशन  च्या सभागृहाच्या आवारात सकाळी आठ पासून सुरू होणार आहे. सदर मतमोजणी प्रक्रियेला पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. तर मतमोजणी दरम्यान वाहतूकीतही बदल करण्यात आल्याचे बोईसर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी सांगितले.
4मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पाळायलाचे नियम, मतमोजणी कालावधी दरम्यान कार्यकत्र्याचे वर्तन, उमेदवारांच्या कार्यकत्र्याना व पाठीराख्यांकरीता नियोजित जागा या संदर्भात पोलीस यंत्रणोत बैठक घेऊन वेगवेगळ्या सूचना दिल्या आहेत.  एक पोलीस उपविभागीय अधिकारी, एक पोलीस निरिक्षक, दोन सहाय्यक पेालीस निरिक्षक, आठ पोलीस उपनिरिक्षकांसह सुमारे शंभर पोलीस कर्मचारी आणि शशस्त्र सेवा बळ, तसेच  राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत.
 
अशी असेल 
वाहतूक व्यवस्था
नवापूर नाका ते टाकी नाका दरम्यानच्या महावीर चेंबर ते टाकी नाक्यार्पयतची वाहतुक पूर्णपणो बंद राहील. तसेच कॅम्लीन नाका ते टाकी नाक्यार्पयतही वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तेथे काही ठिकाणी पार्कीगची व्यवस्था असणार आहे. बॉम्बे रेयॉन ते टाकी नाका नो एन्ट्री, होटेल गंगोत्री ते टीमा नो एन्ट्री तर एमआयडीसी कडील वाहतूक महावीर चेंबर मार्गे मुकट टॅक असा तात्पुरता बदल असणार आहे.

 

Web Title: Today's Grand Finale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.