म्हाडा कार्यालयात आज निवडणुकीची धामधूम
By Admin | Updated: August 28, 2015 04:05 IST2015-08-28T04:05:06+5:302015-08-28T04:05:06+5:30
महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड एम्प्लॉइज को-आॅपरेटिव्हक्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार असल्याने पूर्ण दिवस म्हाडामध्ये

म्हाडा कार्यालयात आज निवडणुकीची धामधूम
मुंबई : महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड एम्प्लॉइज को-आॅपरेटिव्हक्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार असल्याने पूर्ण दिवस म्हाडामध्ये निवडणुकीच्या धामधुमीचे वातावरण असणार आहे.
सोसायटीच्या कार्यकारिणीची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात म्हाडातील दोन पॅनल उतरले असून त्यांच्यामध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. सहयोग पॅनल, मैत्री पॅनल यांनी प्रत्येकी ११ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून शिगेला पोहोचलेला प्रचार थांबला असून शुक्रवारी उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे.
दोन्ही पॅनलकडून म्हाडा मुख्यालयात बॅनरबाजी केली होती. त्यामुळे मतदार कोणत्या पॅनलच्या बाजूने मतदान करणार हे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट होणार आहे. सकाळी १0 ते ४ वाजेपर्यंत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे सोसायटीचा कारभार कोणत्या पॅनलकडे जाणार हे काही तासांमध्येच स्पष्ट होणार असल्याने म्हाडा कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.