अवयवदानाबाबत आज जनजागृती; महावीर इंटरनॅशनल संस्थेतर्फे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:57 IST2018-03-18T00:57:12+5:302018-03-18T00:57:12+5:30
महावीर इंटरनॅशनल संस्थेतर्फे अवयवदानाबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मार्च रोजी मरिन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

अवयवदानाबाबत आज जनजागृती; महावीर इंटरनॅशनल संस्थेतर्फे कार्यक्रम
मुंबई : महावीर इंटरनॅशनल संस्थेतर्फे अवयवदानाबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मार्च रोजी मरिन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अवयव प्रत्यारोपणाचे तज्ज्ञ डॉ. अमित मन्डोत आणि डॉ. दिलीप कृपलानी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यपाल विद्यासागर राव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री दीपक सावंत, आमदार राज पुरोहित, आमदार मंगल प्रभात लोढा आणि भाजपा प्रवक्या शायना एन.सी. या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, विविध कलाकार व गायक या कार्यक्रमात कला सादरीकरण करतील.
संस्थेने सुरू केलेल्या ‘अंगदान महादान, व्यर्थ से अर्थ’ या मोहिमेंतर्गत हजारो लोकांनी अवयवदानासाठीचे अर्ज भरले आहेत. संस्थेच्या
४५० शाखा असून तेथील कार्यकर्ते लोकांच्या घरोघरी जाऊन अवयवदानासंबंधी जनजागृती करतात.