आज १२ गावांचा पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: May 29, 2014 23:37 IST2014-05-29T23:37:57+5:302014-05-29T23:37:57+5:30
जुनी व कालबाह्य झाल्याने नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे जोडणी काम उद्या (दि. ३०) हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी आठपासून रात्री दहा वाजेपर्यंत १५ तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

आज १२ गावांचा पाणीपुरवठा बंद
बोईसर : तारापूर एम.आय.डी.सी. सह परिसरातील बारा ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारी तीस वर्षापूर्वीची जलवाहिनी जुनी व कालबाह्य झाल्याने नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे जोडणी काम उद्या (दि. ३०) हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी आठपासून रात्री दहा वाजेपर्यंत १५ तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. एम.आय.डी.सी. पाणी पुरवठा विभागाकडून तारापूर एम.आय.डी.सी. तील सुमारे बाराशे उद्योग व बोईसर, सरावती, कुंभवली, नवापूर, पास्थळ, मुरबे, साळवड, बेरेगाव, गुंदले, कूरगाव, पाम, टेंभि, आळेवाडी, नांदगाव व खैरापाडा ३, ग्रामपंचायतीच्या २१ जोडण्यातून पाणीपुरवठा करण्यात येत असून उद्या या सर्व भागातून पाणी पुरवठा ठप्प होणार आहे. जुनी जलवाहिनी ही बोर्लाडची (सी. आय.) होती ती बदलण्यात येवून नवीन टाकण्यात आलेली जलवाहिनी ही डकटाईन आयर्न (डी आय) ची आहे. एम.आय.डी.सी. मधील ई झोनमध्ये जुनी पाईपलाईन तेथे नव्याने टाकलेल्या पाईपलाईनची जोडणी करण्यात येणार आहे तर सदर जोडण्या या २ ते ३ ठिकाणी जोडण्याचे काम हाती घेतले आहे. एम.आय.डी.सी. चा पाणीपुरवठा विभाग २४ तासात सुमारे ७० एमएलडी पाणीपुरवठा करते परंतु उद्या सुमारे ४५ एमएलडी पाणी पुरवठा कमी होणार आहे. तर नव्याने जोडण्यात येणार्या जलवाहिनीचा मार्ग एम.आय.डी.सी. कार्यालयापासून बॉम्बे रेयॉन, अंगतपाळ, जे. एम. टेक्साईल, सियाराम, झेनिथ ते साळवड गावापर्यंत जाणार्या रस्त्यापर्यंत आहे. अशी माहिती एम.आय.डी.सी.चे ग्रुप अभियंता नंदकुमार करवा यांनी दिली. (वार्ताहर)