आज पाच लाख वृक्ष लागवडीचा शुभारंभ
By Admin | Updated: June 4, 2015 22:35 IST2015-06-04T22:35:00+5:302015-06-04T22:35:00+5:30
प्रकाशन यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ठाणे महापालिका ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे.

आज पाच लाख वृक्ष लागवडीचा शुभारंभ
ठाणे : हरित ठाणे शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ, जैवविविधता अहवालाचे प्रकाशन यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ठाणे महापालिका ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. पावसाने काहीशी हुलकावणी दिल्याने आणि तो काही दिवस आणखी लांबणार असल्याने पहिल्या दिवशी ५०० वृक्षांची लागवड होणार आहे. पावसाळा सुरू होताच टप्प्याटप्प्याने अडीच लाख वृक्षांची लागवड होईल.
या मोहिमेचा शुभारंभ घोडबंदर येथील ओवळा, परिवहन सेवा बस डेपो येथे सकाळी ११ वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. महापौर संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या समारंभाला खा. राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आ. प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)
1हरित ठाणे शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिकेने येत्या दोन वर्षांत पालिका २ लाख आणि लोकसहभागातून ३ लाख असे एकूण ५ लाख वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
2यामध्ये महापालिका तसेच खाजगी शाळा, स्वयंसेवी संस्था, वित्तीय संस्था आणि नागरिक यांचा सहभाग निश्चित करून त्यांच्यामार्फत आरक्षित भूखंड, सुविधा भूखंड, खेळाची मैदाने आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
3जागतिक पर्यावरणदिनी या मोहिमेचा शुभारंभ होत असून या वेळी पर्यावरणाशी संबंधित दिनदर्शिका, जैवविविधता याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ओवळा डेपो आणि महापालिकेच्या उद्यानामध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे.