आज तिन्ही मार्गावर जम्बो ब्लॉक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 07:17 IST2017-12-31T07:17:24+5:302017-12-31T07:17:37+5:30

‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने रविवारी मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेकडून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. पण सकाळ व दुपारच्या सत्रात प्रवाशांना ‘जम्बो ब्लॉक’ला सामोरे जावे लागणार आहे.

 Today the Jumbo block on all three roads | आज तिन्ही मार्गावर जम्बो ब्लॉक  

आज तिन्ही मार्गावर जम्बो ब्लॉक  

मुंबई : ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने रविवारी मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेकडून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. पण सकाळ व दुपारच्या सत्रात प्रवाशांना ‘जम्बो ब्लॉक’ला सामोरे जावे लागणार आहे.
मध्य रेल्वेमार्गावर दिवा ते कल्याण डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर सांताक्रुझ आणि माहिम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत जम्बो मेगाब्लॉक घेतला जाईल. तसेच, बोरीवली ते नायगाव स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे. हार्बर रेल्वे मार्गावर नेरुळ ते पनवेल स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरुन सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरुन कल्याणहून सुटणाºया अप जलद मार्गाच्या फेºया सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंत ठाण्यात अप स्लो मार्गावर चालवण्यात येतील. ठाणे आणि सीएसएमटीपर्यंत लोकल नियमित अप फास्ट मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉक दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत सीएसएमटीला येणाºया आणि जाणाºया धिम्या मार्गावरील लोकल गाडया १० मिनिटे उशिराने धावतील.
सांताक्रुझ आणि माहिम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लोकल सांताक्रु झ आणि माहिम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर चालवण्यात येणार असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरुळ डाऊन मार्गावरुन सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.०६ ते दुपारी ४.३० वाजता पनवेल-बेलापूरहून सीएसटीएमच्या दिशेने सुटणाºया सर्व अप -डाऊन हार्बर मार्गावरील गाड्याच्या सेवा बंद असणार आहे. तर, सकाळी ११.१४ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलला सुटणाºया सर्व डाऊन ट्रान्सहार्बर लाइन गाड्या सकाळी ११.२ ते दुपारी ४.२६ वाजेपर्यंत ठाण्यासाठी पनवेलहून सुटणाºया सर्व अप-ट्रान्सहार्बर गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक दरम्यान पनवेल-अंधेरी सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

परळ स्थानकात पादचारी पूलासाठी ब्लॉक

मध्य रेल्वेच्या परेल स्थानकात नवीन पादचारी पुलाच्या कामासाठी स्पेशल ट्रफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परेल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर हा ब्लॉक असणार आहे. मांटुगा ते भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येत आहे. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दरम्यान माटुंगा स्थानकातून सीएसएमटीसाठी रात्री ११.५७ ते पहाटे ५ .०२ वाजेपर्यंत सुटणाºया सर्व लोकल गाड्या मांटुगा ते भायखळा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

Web Title:  Today the Jumbo block on all three roads

टॅग्स :Mumbaiमुंबई